बाप्पाला खाऊ घाला ६ प्रकारचे चविष्ट मोदक

Mansi Khambe

माघी गणेश चतुर्थी

राज्यभरात माघी गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. या निमित्त अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून बाप्पाची आरासना केली जाते. तसेच गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो.

Modak Types

|

ESakal

विविध प्रकारचे मोदक

यावेळी उकडीचे किंवा तळलेले मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून दिले जाते. मात्र या सोबतच मोदकाच्या विविध प्रकारांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Modak Types

|

ESakal

खारट-गोड मोदक

तांदूळ किंवा गव्हाच्या पिठापासून खारट-गोड मोदक बनवले जातात. यामध्ये डाळी, औषधी वनस्पती आणि मसाले यांसारख्या मसालेदार घटकांची सारण भरलेली असते. ज्यामुळे याची चव खारट-गोड लागते.

Modak Types

|

ESakal

रवा मोदक

रवा मोदक हे रवा, नारळ आणि गूळ वापरून बनवले जातात. या मोदकांमुळे पारंपरिक पाककृतीला एक वेगळाच स्वाद मिळतो. तसेच चवीमुळे ते आवडीने खाल्ले जातात.

Modak Types

|

ESakal

गुलकंद मोदक

सुपारीची पाने, नारळ पावडर, गुलकंद, ड्राय फ्रूट पावडर, बडीशेप पावडर याचा वापर करून गुलकंद मोदक बनवले जातात.

Modak Types

|

ESakal

नारळाचे मोदक

नारळ आणि मिल्कमेडपासून नारळाचे मोदक बनवले जातात. हे तयार करण्यास सोपे आहे आणि उत्सवाच्या प्रसादासाठी परिपूर्ण आहे.

Modak Types

|

ESakal

साखरमुक्त मोदक

शुगर फ्री मोदक बनवण्यासाठी विविध ड्रायफ्रुट्स आणि खोबरे कापून हलक्या तुपात तळून घ्या. यानंतर खजूर दुधात भिजवल्यानंतर मनुका पेस्ट तयार करा. गॅसवर थोडा वेळ शिजवून त्यात सारण भरून मोदक तयार करा.

Modak Types

|

ESakal

तिळगुळाचे मोदक

कणीक नीट मळून त्याची पातळ पोळी लाटा. या पोळीत भाजलेले तिळ आणि गुळाचे सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. त्यानंतर हे मोदक मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

Modak Types

|

ESakal

मुंबई महापालिकेचा महापौर पदाचा प्रवास... 2000 पासून आतापर्यंत कोणत्या कोट्याचा महापौर होता? वाचा...

BMC mayor history

|

ESakal

येथे क्लिक करा