शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता या उपायांनी करा पूर्ण!

Anushka Tapshalkar

मॅग्नेशियम

आयरन, झिंक, फायबर, पोटॅशियम आणि इतर जीवनसत्त्वांसोबत मॅग्नेशियम हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे.

Magnesium

|

sakal

मॅग्नेशियमचे महत्त्व

मॅग्नेशियम हाडांच्या मजबूतीसाठी पोटॅशियम आणि कॅल्शियमसोबत मदत करते. शरीराच्या विविध कार्यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

Magnesium Importance

| sakal

मेंटल हेल्थसाठी फायदेशीर

मॅग्नेशियम न्यूरो प्रणाली आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते कमी असेल तर, मेंदू आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

Mental Health

|

sakal

कमतरतेची लक्षणे

मॅग्नेशियमच्या अभावामुळे हात-पाय सुन्न पडणे, मुंग्या येणे, थकवा जाणवणे, स्नायू अखडणे, हृदयाची गती कमी-जास्त होणे आणि शरीराच्या इतर कार्यांमध्ये अडथळे येऊ शकतात.

Fatigue

|

sakal

हार्टसाठी धोका

शरीरात मॅग्नेशियमची कमी असेल तर, हृदयाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात.

Heart Health

|

sakal

मॅग्नेशियमचे स्त्रोत

पालक, भोपळ्याच्या बिया, सुकामेवा यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते.

Magnesium Sources

| sakal

संतुलित आहार आवश्यक

मॅग्नेशियमची कमी पूर्ण होण्यासाठी संपूर्ण पोषणासह मॅग्नेशियमचा संतुलित आहार घ्या.

Eat Balanced Diet | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Doctor's Advice

|

sakal

सहज बॉडी डिटॉक्ससाठी नियमित खा 'हे' पदार्थ

Body Detox | sakal
आणखी वाचा