Pranali Kodre
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने सिडनी कसोटीत भारतीय संघावर विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली.
या मालिका विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३-२५ स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करता आला.
आता गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघासमोर जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकन संघाचे आव्हान असणार आहे.
दक्षिण आफ्रिकन संघाने आतापर्यंत ११ सामन्यांमधून सात सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांना फक्त तीनच लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या त्यांचा संघ ६६.६७ टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियन संघ ६३.७३ टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने १७ सामन्यांमधून ११ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांचे अद्याप दोन सामने बाकी आहे.
आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ११ ते १५ जून दरम्यान रंगणार आहे.
हा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होईल.