Yashwant Kshirsagar
प्रयागराजमध्ये गंगा, जमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर महाकुंभ 2025 सुरु आहे.
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव कुंभमेळा 13 जानेवारी पासून सुरु झाला आहे.
कुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी इथे कोट्यावधी भाविक रोज येत आहेत.
प्रयागराजमधील कुंभमेळा 26 फेब्रवारी 2025 पर्यंत सुरु राहिल
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इंग्रजांना कुंभमेळ्याची खूप भीती वाटत होती.
असं म्हटले जाते की, कुंभ मेळ्यात लोक एकत्र होऊन विद्रोह करतील अशी भीती इंग्रजांना वाटत होती.
स्वातंत्र्याच्या आधी 1942 मध्ये प्रयागराजमध्ये शेवटचा कुंभमेळा भरला होता.
इंग्रजांनी त्यावेळी देशभरातून येणाऱ्या भाविकांना प्रतिबंध केला होता.
त्यांचं म्हणणं होते की, मोठ्या संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.