Anushka Tapshalkar
महाकुंभ मेळ्यात नागा साधूंना विशेष मान मिळतो. त्यांची जीवनशैली, आहार आणि अनोख्या सवयी प्रेरणादायी आहेत. त्यापैकीच त्यांची एक खासियत म्हणजे ते सर्व ऋतूंमध्ये कपडे न घालता राहतात. त्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही का असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
नागा साधू कोणत्याही ऋतूमध्ये कपड्यांविना सहज राहू शकतात. त्यांना थंडीचा त्रास होत नाही.
हे नागा साधू तीन प्रकारचे योग्य करतात. ज्यामुळे त्यांचे शरीर थंडीसाठी अनुकूल होते.
नागा साधू शरीर आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवतात. त्यासाठी ते त्यांच्या विचार आणि आहारावर संयम ठेवतात.
नियमित सरावाने शरीर आपल्या शरीराचे तापमान कोणत्याही हवामानात जुळवून घेतं.
नागा साधू कठोर तपस्या करतात. त्यामुळे शरीराची उष्णता टिकवून ठेवता येते.
नागा साधू मनावर नियंत्रण ठेवून थंडीची जाणीव कमी करतात तसेच त्यांचे आरोग्य संतुलित ठेवतात.
नागा साधूंनी साधनेचा सराव करुन त्यांचे शरीर कोणत्याही वातावरणासाठी साजेसं केले आहे, त्यामुळे त्यांना थंडीचा त्रास होत नाही.