Monika Shinde
महाशिवरात्री ही भगवान शिवाला समर्पित पवित्र रात्र आहे. या दिवशी उपवास, पूजा आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. पण हे जागरण इतके महत्त्वाचे का मानले जाते?
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. त्यामुळे ही रात्र शिव-शक्तीच्या पवित्र मिलनाची प्रतीक मानली जाते.
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal
काही पुराणकथांनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी याच दिवशी प्राशन केले. त्यामुळे सृष्टीचे रक्षण झाले आणि हा दिवस विशेष पवित्र ठरला.
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal
महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून शिवनाम जप केल्यास पापांचा नाश होतो, असे धर्मग्रंथ सांगतात. भक्तीभावाने केलेली साधना मन शुद्ध करते.
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal
रात्र ही अंधाराचे प्रतीक आहे. या अंधारात जागृत राहून शिवस्मरण करणे म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय मिळवणे, असा आध्यात्मिक अर्थ मानला जातो.
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal
जागरणामुळे मन एकाग्र होते. मंत्रजप, भजन आणि ध्यान यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अंतर्मन शांत होते, अशी श्रद्धा आहे.
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal
धर्मग्रंथांनुसार, या रात्री केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी ठरतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात.
Spiritual Significance of Staying Awake on Mahashivratri
esakal