Aarti Badade
महाबळेश्वरला भेट देण्याचा प्लॅन असेल, तर जवळच असलेल्या ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यालाही आवर्जून भेट द्या.
pratapgad
Sakal
महाबळेश्वर शहर किंवा एसटी बस स्थानकापासून प्रतापगड किल्ला साधारण २१ ते २४ किलोमीटर अंतरावर आहे.
pratapgad
Sakal
महाबळेश्वर-महाड मार्गाने प्रतापगडाकडे जाता येते आणि या प्रवासात घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.
pratapgad
Sakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे.
pratapgad
Sakal
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट झाली आणि त्यानंतर संघर्ष झाला.
pratapgad
Sakal
प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि ऐतिहासिक तटबंदी पाहता येते.
pratapgad
Sakal
महाबळेश्वरच्या सहलीत प्रतापगडाचा समावेश केल्यास निसर्गासोबतच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासही अनुभवता येईल.
Pratapgad
Sakal
raiagd fort
Sakal