शिवरायांची राजधानी! रायगड किल्ल्यावर गेल्यावर 'ही' 7 ठिकाणे पाहायला विसरू नका!

Aarti Badade

रायगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर इतिहासाची साक्ष देणारी अनेक महत्त्वाची ठिकाणे आजही पाहायला मिळतात.

raiagd

|

Sakal

राजसभा आणि शिवरायांची समाधी

रायगडावरील राजसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक झाला, तर नगारखान्यासमोर महाराजांची समाधी आणि राजसभेजवळ त्यांचा पुतळा आहे.

raiagd

|

Sakal

जगदीश्वर मंदिर आणि गंगासागर तलाव

गडावरील जगदीश्वर मंदिर स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असून गंगासागर तलावाला शिवराज्याभिषेकाशी संबंधित ऐतिहासिक महत्त्व आहे.

raiagd

|

Sakal

ऐतिहासिक बाजारपेठ आणि नगारखाना

रायगडावरील दोन्ही बाजूंना दुकानांच्या रांगा असलेली बाजारपेठ आणि राजदरबारापर्यंत आवाज पोहोचवणारी नगारखान्याची रचना आवर्जून पाहण्यासारखी आहे.

raiagd

|

Sakal

हिरकणी बुरूज आणि टकमक टोक

हिरकणी बुरुजाला हिरकणीच्या धाडसी पराक्रमाची कथा जोडलेली आहे, तर टकमक टोक हा गडावरील प्रसिद्ध आणि उंच कडा आहे.

raiagd

|

Sakal

महादरवाजा आणि वाघ दरवाजा

रायगडाचा मजबूत महादरवाजा मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो, तर वाघ दरवाजा हा गडावरील महत्त्वाच्या ऐतिहासिक मार्गांपैकी एक आहे.

raiagd

|

Sakal

हत्तीखाना आणि शिर्काई देवी मंदिर

गडावरील हत्तीखाना, हत्ती तलाव आणि ग्रामदेवता शिर्काई देवीचे मंदिर पाहून रायगडाचा ऐतिहासिक वारसा अनुभवता येतो.

raiagd

|

Sakal

श्रीमंतीचा मार्ग दाखवणारी चाणक्यांची 3 सूत्रं; आजच जाणून घ्या!

chanaky niti 

|

Sakal

येथे क्लिक करा