सकाळ डिजिटल टीम
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे रहस्य आणि इतिहास काय आहे जाणून घ्या.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एका कथेनुसार, प्राचीन काळी 'दूषण' नावाचा एक राक्षस होता, ज्याने पृथ्वी आणि स्वर्गाला त्रास दिला होता. भगवान शिवाने त्याचा वध करून या भागाला त्याच्या पासून वाचवले, आणि त्याचे नाव 'महाकाल' ठेवल्याची माण्यता आहे.
असे मानले जाते की, महाकालेश्वर मंदिराची स्थापना चंद्रसेन नावाच्या राजाने केली होती, जो भगवान शंकराचा भक्त होता.
मध्ययुगीन काळात, मंदिर अनेकवेळा नष्ट झाले आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. इल्तुमिशने 13 व्या शतकात मंदिरावर हल्ला करून त्याची तोडफोड केली होती, परंतु नंतर ते पुन्हा बांधले गेल्याचे सांगीतले जाते.
सध्याचे मंदिर मराठा साम्राज्याचे सेनापती राणोजी शिंदे (Ranoji Shinde) यांनी 18 व्या शतकात बांधले.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे शैव संप्रदायासाठी (शैव धर्मासाठी) खूप महत्वाचे मानले जाते.
दर 12 वर्षांनी उज्जैन शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.
महाकालेश्वर मंदिरातील 'भस्म आरती' ही एक प्रसिद्ध धार्मिक विधी आहे, जी भाविक मोठ्या श्रद्धेने बघायला जातात.