पंढरपुरात विठोबाची मूळ मूर्ती नाही? 'या' गावात खरी मूर्ती असल्याचा दावा

संतोष कानडे

विठोबा

सध्या पंढरपुरात असलेली विठोबाची मूर्ती ही मूळ मूर्ती नाही, असा दावा पूर्वीपासून केला जातो. विशेषतः १९८० पासून.

पंढरपूर

पंढरपुरातील मूर्ती खरी नसून सोलापूर जिल्ह्यातल्याच माढा गावातील विठ्ठल मूर्ती खरी आहे, असं सांगितलं जातं.

रा. चिं. ढेरे

असा दावा लोकसंस्कृतीचे प्रख्यात अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी १९८१ मध्ये 'केसरी' वृत्तपत्रातून केला होता.

लेख

१५ आणि १६ फेब्रुवारी १९८१ रोजी ढेरे यांचे सलग दोन लेख प्रकाशित झालेले होते. तेव्हा सांस्कृतिक विश्वात चांगलीच खळबळ उडाली होती.

केसरी

रा.चिं. ढेरे यांनी पाद्म माहात्म्य आणि स्कंद पुराण ही दोन संस्कृत भाषेतील माहात्मे दाखल्यादाखल समोर ठेवली होती.

कूटमंत्र

या दोन्ही पांडुरंग माहात्म्यांमध्ये, विठ्ठलाच्या मूर्तीवरील छातीवर एक षडक्षरी कूटमंत्र कोरलेला आहे, असा उल्लेख येतो.

श्रीविठ्ठलः एक महासमन्वय

ढेरे आपल्या 'श्रीविठ्ठलः एक महासमन्वय' या शोधग्रंथात म्हणतात, पंढरपुताल्या विठ्ठल मूर्तीवर अशी अक्षरे नाहीत.

माढा

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा गावातील विठ्ठल मंदिरातील मूर्तीवर असा मंत्र असल्याचा दावा ढेरे करतात.

तुकोबा

ज्ञानदेवांपासून ते तुकोबांपर्यंत सर्व संतांनी ज्या मूर्तीच्या चरणांवर माथा टेकवला, ती मूळ मूर्ती आपल्याला मिळू शकते, असं ते सांगतात.

आद्यमूर्ती

माढ्यातील मूर्ती हीच आद्यमूर्ती असावी, अशी शक्यता ढेरे यांनी त्या दोन लेखांमधून व्यक्त केलेली आहे.

प्रतिमा

मात्र ढेरे यांच्या दाव्यावर अनेक अभ्यासकांनी प्रतिदावे केले. त्यानंतर ढेरे यांनी म्हटलं की,माढ्यातील मूर्ती खरी नसली तरी आद्यमूर्तीची प्रतिमा असावी.

'या' गावात आल्यानंतर वारकरी धावू का लागतात?

vithoba | esakal
<strong>येथे क्लिक करा</strong>