Kolhapur Tourism Places : महालक्ष्मी मंदिरापासून खिद्रापूरपर्यंत… पाहा कोल्हापूरची खास ठिकाणे!

Sandeep Shirguppe

महालक्ष्मी मंदिर

करवीर निवासिनी अंबाबाईचे हे मंदिर कोल्हापूरची ओळख मानले जाते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Kolhapur tourist places

|

esakal

रंकाळा तलाव

सायंकाळच्या सुंदर वातावरणासाठी प्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथील चौपाटी आणि बोटिंगचा अनुभव खास असतो.

Kolhapur tourist places

|

esakal

पन्हाळा किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला हा भव्य किल्ला निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Kolhapur tourist places

|

esakal

जोतिबा मंदिर

डोंगररांगांमध्ये वसलेले जोतिबाचे मंदिर धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. चैत्र यात्रेत येथे मोठी गर्दी होते.

Kolhapur tourist places

|

esakal

न्यू पॅलेस

शाहू महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा हा राजवाडा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

Kolhapur tourist places

|

esakal

दाजीपूर अभयारण्य

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे अभयारण्य वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरते.

Kolhapur tourist places

|

esakal

कणेरी मठ

आध्यात्मिक वातावरणासोबत ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.

Kolhapur tourist places

|

esakal

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरचे पुरातन कोपेश्वर मंदिर मनमोहित करते. नदी किनाऱ्यावर वसलेल्या मंदिराला एकवेळ अवश्य भेट द्यावी.

Kolhapur tourist places

|

esakal

आणखी पाहा...