महाराष्ट्रातलं ५ हजार वर्ष जुनं शिवमंदिर, गाभाऱ्यात आहे अनोखं रहस्य...

Shubham Banubakode

5 हजार वर्षांचा इतिहास

अमरावतीतील कोंडेश्वर मंदिराचा इतिहास सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. विदर्भ राजाने कौंडिय मुनींच्या आग्रहावरून येथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

काशीशी नाळ

विदर्भ राजा काशी क्षेत्रातील भगवान विश्वेश्वराचा भक्त होता. त्यामुळे कोंडेश्वराची परंपरा थेट काशीशी जोडली जाते.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

ऋषी-मुनींची परंपरा

प्राचीन काळी काशी, प्रयागराज, ओंकारेश्वर आदी ठिकाणांहून ऋषी-मुनी, साधुसंत येथे येत असत. शिवभक्तीचा सुगंध आजही परिसरात दरवळतो.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

हेमाडपंथी वास्तुकला

यादवकालीन हेमांद्रीपंत यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. काळ्या पाषाणातील भव्य हेमाडपंथी शैलीत मंदिर उभारण्यात आले.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

75 फूट उंची

पूर्वी मंदिराची उंची फक्त 12 फूट होती. पुढील जीर्णोद्धारात मूळ दगड वापरून ती तब्बल 75 फूट करण्यात आली.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

गाभाऱ्यातील अद्भुत रहस्य

कोंडेश्वरावर सतत जलधारा असते, पण शिवलिंग पूर्णपणे कधीच पाण्यात बुडत नाही. पाणी जायला जागा नसताना हजारो लिटर पाणी नेमके कुठे जाते हे आजही गूढ आहे.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

दगडावरील हत्तींचे कोरीव काम

मंदिराच्या पायथ्याशी कोरलेले हत्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही ठिकाणी दोन शरीरांना एक मुख तर काही ठिकाणी दोन मुखांना एक देह दिसतो.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

महाशिवरात्रीला भव्य यात्रा

श्रावण सोमवारी मोठी गर्दी असतेच, पण महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते. अमरावतीसह नागपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात.

5000 Year Old Kondeshwar Temple Mystery

|

esakal

महाराष्ट्रातील 'या' मंदिरात आहे भविष्य सांगणारा रहस्यमयी दगड

Tulja Bhavani Temple Mystery

|

esakal

हेही वाचा -