प्रत्येक फूडीने आयुष्यात एकदा तरी चाखायलाच हवेत ‘हे’ 10 महाराष्ट्रीयन पदार्थ

Anushka Tapshalkar

महाराष्ट्र दिन 2026

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मराठी ओळख, पराक्रम आणि ऐक्याचा हा उत्सव असून, या दिवशी राज्यभर सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रम आयोजित केले जातात.

Maharashtra Din 2026

|

sakal

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती गोड, तिखट, मसालेदार आणि पारंपरिक चवींचा अनोखा संगम आहे; त्यामुळे हे पदार्थ प्रत्येकाने अनुभवायलाच हवेत.

Maharashtrian Famous Dishes 

|

sakal

पुरणपोळी

गुळ आणि चण्याच्या डाळीच्या सारणाने भरलेली मऊ पोळी. वेलची आणि जायफळाच्या सुगंधामुळे सणासुदीला तिची चव आणखी खास लागते.

Traditional Puranpoli | sakal

थालीपीठ

विविध धान्यांच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक थालीपीठ, लोणी, दही किंवा चटणीसोबत खाल्ले जाते.

Thalepeeth

|

sakal

वडापाव

मुंबईची ओळख मानला जाणारा हा लोकप्रिय स्ट्रीट फूड. मसालेदार बटाटेवडा, चटण्या आणि तिखट मिरचीसोबत पावात सर्व्ह केला जातो.

Vada Pav

|

sakal

मिसळ पाव

मोड आलेल्या कडधान्यांच्या रस्स्यावर फरसाण, कांदा आणि कोथिंबीर टाकून तयार होणारा तिखट आणि झणझणीत पदार्थ.

Misal Pav | sakal

भरली वांगी

छोट्या वांग्यांमध्ये खोबरे आणि शेंगदाण्याच्या मसाल्याचे सारण भरून बनवलेली चविष्ट भाजी, जी भाकरीसोबत अप्रतिम लागते.

Bharli Vangi

|

sakal

पोहे

कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता आणि हळदीसह बनवलेले हलके पण चवदार नाश्त्याचे पदार्थ, ज्यावर लिंबू आणि शेव टाकली जाते.

Pohe

|

sakal

साबुदाणा खिचडी

उपवासात खाल्ली जाणारी ही हलकी आणि पौष्टिक डिश साबुदाणा, शेंगदाणे आणि सौम्य मसाल्यांनी तयार केली जाते.

Sabudana Khichdi | sakal

बॉम्बील फ्राय

मसाले लावून रव्यामध्ये घोळवून तळलेला बॉम्बील मासा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी याची खास चव असते.

Bombil Fry

|

sakal

सोलकढी

कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेले थंडगार पेय, जे पचनासाठी फायदेशीर मानले जाते.

Solkadhi

| sakal

नाव ऐकून हसाल, पण ‘लंगडा आंब्या’ची कथा आहे भन्नाट!

Langda Mango Name Story

|

sakal

आणखी वाचा