ई पीक पाहणीत मोठे बदल, शेतकऱ्यांची चिंता मिटली; सरकारने घेतला मोठा निर्णय

सूरज यादव

ई पीक पाहणी

शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. शेतात इंटरनेटची समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतातील पिकांची नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता.

e-Peek Pahani

|

Sakal

प्रत्यक्ष नोंदणी

पिके शेतात उभी असताना कधीही आणि शासनाने निश्चित केलेल्या अंतिम तारखेपर्यंत संबंधित पीक पाहणी सहायकाला आता शेतात प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

e-Peek Pahani

|

Sakal

सहाय्यक

पीक पाहणी सहायक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे कर्मचारी, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक किंवा मानधन तत्त्वावरील कर्मचारी उपलब्ध नसल्यास, माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात यावी.

e-Peek Pahani

|

Sakal

नियुक्ती

पीक पाहणी सहायकांची नियुक्ती तहसीलदारांमार्फत केली जाणार आहे. तर प्रत्येक १ हजार ते १५०० ओनर्स प्लॉटसाठी किमान एका सहायकाची नियुक्ती करावी.

e-Peek Pahani

|

Sakal

नोंदणी

संबंधित पीक पाहणी सहायकाने लागवड केलेल्या पिकांच्या तपशीलासह लागवड केलेल्या पिकाचे क्षेत्र, जलसिंचनाचा स्रोत व प्रकार, शेताच्या बांधावरील वृक्ष, कायम पड जमीन, शेतातील उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती नोंद करावी.

e-Peek Pahani

|

Sakal

पीक पाहणी

सहायकाने शेताच्या बांधापासून २० मीटरच्या आत उभा राहून शेतातील उभ्या पिकांचे, शेताच्या बांधावरील वृक्षांचे तसेच नोंदविलेल्या कायम पड जमिनीचे अक्षांश व रेखांश यांसह जिओ-टॅग केलेली किमान दोन फोटो अपलोड करावेत.

e-Peek Pahani

|

Sakal

पडताळणी

पीक पाहणी सहायकाने नोंदविलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत स्वयंघोषणापत्र 'DCS MH' मोबाईल अॅपच्या माध्यमातून सादर करणे बंधनकारक आहे. सर्व पीक पाहणी नोंदींची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकाऱ्याने केल्यानंतर गाव नमुना नंबर १२ वर दिसेल.

e-Peek Pahani

|

Sakal

चूक, दुरुस्ती

पीक पाहणीची माहिती चुकीची आढळल्यास पीक नोंद रद्द करण्यात येईल. तसेच, सदर क्षेत्राची पीक नोंदणी पुन्हा करण्यात येईल. कोणतीही दुरुस्ती करायची असेल तर चालू हंगाम संपण्यापूर्वी मंडळ अधिकाऱ्याकडे डीसीएसद्वारे अर्ज करता येईल.

e-Peek Pahani

|

Sakal

वैधता

पीक पाहणीची माहिती चुकीची असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत, सर्व शासकीय योजना व पीक कर्ज, पीक विमा तसेच शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या इतर शेती योजनांसाठी वैध मानण्यात येईल.

e-Peek Pahani

|

Sakal

फळबाग

बहुवार्षिक फळबागा, काजू, आंबा, पेरू, चिकू आदींची वेब अॅपद्वारे एकदा नोंदणी झाल्यानंतर संबंधित फळबाग शेतामध्ये अस्तित्वात असल्याचे गृहीत धरून पुढील सलग तीन वर्षे पुनः नोंदणी करण्याची गरज नाही.

e-Peek Pahani

|

Sakal

आहारात गूळ का असावा? शरीरात होतात 'हे' बदल

jaggery Water benefits |

Sakal

इथं क्लिक करा