सूरज यादव
राज्यातल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर नेण्यासाठी गेल्या वर्षी लॉटरी पद्धतीने निवड केली होती. पण ती प्रक्रिया रद्द करून आता नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत.
परदेश दौऱ्यासाठी राज्य सरकार १७० शेतकऱ्यांची निवड करणार आहे. शेती अभ्यासासाठी हा परदेश दौरा असणार आहे.
शेतकऱ्यांकडून आता अर्ज मागवण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यातून सरासरी पाच शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.
परदेश दौऱ्यासाठी एक महिला शेतकरी, एक केंद्र किंवा राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन असे शेतकरी पात्र असतील.
शेतकऱ्यांना सातबारा व आठ अ उतारा, फार्मर आयडी, वय २५ पेक्षा जास्त, वैध पासपोर्ट, डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र ही कागदपत्रं द्यावी लागतील.
फक्त शेतीवर अवलंबून असलेल्यांना आणि एका कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते.
परदेश अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा एक लाख रुपये इतका खर्च सरकार शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देणार आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्यांशी या योजनेसंदर्भात माहितीसाठी संपर्क करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ अशी आहे.