Aarti Badade
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये काही असे दुर्गम किल्ले आणि सुळके आहेत, जिथे चढाईसाठी रोप क्लायंबिंग किंवा रॅपलिंगचे कौशल्य आवश्यक ठरते.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
रायगड आणि तोरणा किल्ल्यांच्या दरम्यान असलेला लिंगाणा हा उंच सुळक्यासारखा दुर्ग आहे. येथील अवघड कातळ चढाईसाठी तज्ज्ञ गिर्यारोहक आणि दोरीसह विशेष सुरक्षा साहित्याची गरज असते.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील अलंग, मदन आणि कुलंग हे सह्याद्रीतील आव्हानात्मक दुर्ग मानले जातात. उभे कातळ, अवघड चढाई आणि कठीण उतार पार करण्यासाठी काही टप्प्यांवर दोरीचा वापर करावा लागतो.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
माळशेज घाट परिसरातील मोरोशीचा भैरवगड त्याच्या उभ्या कातळरचनेसाठी प्रसिद्ध आहे. माथ्याकडे जाणाऱ्या अरुंद कातळवाटा आणि अवघड चढाईमुळे येथे विशेष काळजी घ्यावी लागते.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
पनवेलजवळील कलावंतीण दुर्गावरील उभ्या कातळकोरीव पायऱ्या ट्रेकर्ससाठी आव्हानात्मक ठरतात. हवामान आणि परिस्थितीनुसार काही मोहिमांमध्ये दोरीचा वापर केला जातो.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
ढाक बहिरीच्या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी कातळातील खाचा आणि अवघड चढाई पार करावी लागते. तर जीवधनजवळील वानरलिंगी सुळका सर करण्यासाठी तांत्रिक रॉक क्लायंबिंगचे कौशल्य आवश्यक असते.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
या ठिकाणी चढाई करण्यापूर्वी पुरेसा अनुभव, योग्य गिर्यारोहण साहित्य आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांची मदत घेणे आवश्यक आहे. केवळ साहसाच्या उत्साहात स्वतःहून दोरीची चढाई करण्याचा प्रयत्न करू नका.
Maharashtra Rope Climbing Forts
Sakal
shivaji maharaj navy ship
Sakal