विहिरीत दडलाय गुप्त राजवाडा! महाराष्ट्रातल्या 'या' गावात आहे ३०० वर्ष जुनी वास्तू

Shubham Banubakode

विहिरीत राजवाडा

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात अशी एक विहीर आहे, जिच्या आत चक्क राजवाडा बांधण्यात आला आहे. ही विहीर सामान्य नसून स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

कुठे आहे ही विहीर

साताऱ्याजवळील लिंब गावात ही विहीर असून साताऱ्यापासून १६ किमी अंतरावर आहे. ही विहीर पाहण्यासाठी आजही इतिहासप्रेमी भेट देतात.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

३०० वर्ष जुनी ‘बारा मोटेची विहीर’

ही विहीर जवळपास ३०० वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून ‘बारा मोटेची विहीर’ या नावाने ती प्रसिद्ध आहे.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

कधीच न आटणारी विहीर

गेल्या ३०० वर्षांत ही विहीर कधीही कोरडी पडलेली नाही, हे तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

वीरुबाई भोसले यांची दूरदृष्टी

१७१९ ते १७२४ दरम्यान छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरुबाई भोसले यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बांधकाम करण्यात आले.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

३३०० आंब्यांसाठी पाणीपुरवठा

११० फूट खोल आणि ५० फूट व्यास असलेली ही विहीर ३३०० आंब्यांच्या झाडांना पाणी देण्यासाठी बांधण्यात आली होती.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

हेमाडपंती स्थापत्याचा चमत्कार

या विहिरीत चुना-सिमेंट न वापरता दगडावर दगड बसवून हेमाडपंती पद्धतीने भव्य महाल उभारण्यात आला आहे.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

शिवरायांचं शिल्प आणि गुप्त वाटा

विहिरीतील खांबांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, गणपती-हनुमान मूर्ती, कलाकुसर, प्रशस्त जिने आणि चोरवाटा आजही पाहायला मिळतात.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

छावा चित्रपटाचं शूटींग

या ठिकाणी छावा चित्रपटांचं शूटींगही करण्यात आलं होतं.

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

महाराष्ट्रातल्या 'या' गावात कधीच विकलं जात नाही दूध; कारण ऐकून धक्का बसेल

Maharashtra Village Where Milk Is Never Sold

|

esakal

हेही वाचा -