Ashok Jawale
दिसायला गांडुळासारखा, पण हा आहे पाय नसलेला उभयचर! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये सापडलेल्या या जीवाचे नाव आहे ‘जिनिओफिस चंदगडी’.
Gegeneophis Chandgadi
esakal
हा सिसिलियन (Caecilian) गटातील उभयचर असून त्याला पाय नसतात. शरीर लांबट असल्यामुळे त्याला अनेकदा गांडूळ किंवा साप समजले जाऊ शकते.
Gegeneophis Chandgadi
esakal
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बुझवडे गावाच्या परिसरात या प्रजातीचे नमुने आढळले. ऑगस्ट २०२५ मधील पावसाळी सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना हा जीव सापडला.
Gegeneophis Chandgadi
esakal
पडलेली कुजकी लाकडे, पालापाचोळा आणि सेंद्रिय पदार्थ असलेल्या ओलसर जागांमध्ये हा जीव आढळला. जमिनीखाली राहण्याच्या सवयीमुळे अशा प्रजाती सहज नजरेस पडत नाहीत.
Gegeneophis Chandgadi
esakal
संशोधकांनी शरीररचनेचा सविस्तर अभ्यास आणि जनुकीय विश्लेषण यांच्या आधारे या जीवाची स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख निश्चित केली.
Gegeneophis Chandgadi
esakal
या प्रजातीचे नाव चंदगड परिसरात बोलल्या जाणाऱ्या ‘चंदगडी’ बोलीवरून ठेवण्यात आले.
Gegeneophis Chandgadi
esakal
पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. या शोधामुळे जमिनीखाली राहणाऱ्या उभयचरांच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित झाले.
Gegeneophis Chandgadi
esakal
मातीतील जीवसृष्टी जपण्यासाठी अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळा आणि अशा जीवांना हाताळण्याऐवजी तज्ज्ञांना माहिती द्या.
Gegeneophis Chandgadi
esakal
Mongoose
esakal