Varsha Balhe
आज जिथे महाराष्ट्रात मोठमोठी शहरं, गावं आणि रस्ते आहेत, तिथे हजारो वर्षांपूर्वी घनदाट जंगलं आणि मोकळे प्रदेश होते. त्या काळात माणसांचं आयुष्य आजच्यासारखं नव्हतं. ना पक्की घरं, ना शेती आणि ना आधुनिक सोयीसुविधा.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
१० हजार वर्षांपूर्वी माणसं प्रामुख्याने भटकंती करून राहत होती. अन्नाच्या शोधात ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. डोंगरातील गुहा, कपारी आणि नैसर्गिक आडोशांचा निवाऱ्यासाठी वापर केला जात असे.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
त्या काळात शेतीचा वापर आजच्यासारखा नव्हता. त्यामुळे माणसं शिकार करून आणि जंगलातून अन्न गोळा करून पोट भरत होती. रानटी फळं, कंदमुळं, बिया, मध, मासे आणि लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार हा त्यांच्या आहाराचा भाग होता.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
त्या काळात माणसं दगडांपासून छोटी आणि धारदार हत्यारं बनवत होती. या हत्यारांना 'मायक्रोलिथ्स' म्हटलं जातं. त्यांचा वापर शिकार, मांस कापणं आणि इतर कामांसाठी केला जात असे. लाकडी दांड्यांना ही पाती जोडून भाले आणि बाणांसारखी साधनं तयार केली जात.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात प्राचीन कातळशिल्पं आढळतात. दगडांवर कोरलेल्या या चित्रांमध्ये प्राणी, पक्षी आणि मानवी आकृत्या दिसतात. या चित्रांमधून त्या काळातील माणसांच्या जीवनाची आणि त्यांच्या सभोवतालच्या निसर्गाची माहिती मिळते.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
आज महाराष्ट्रात दिसणाऱ्या प्राण्यांपेक्षा त्या काळातील जैवविविधता वेगळी होती. प्राचीन कातळशिल्पांमध्ये हत्ती, गेंडा, कासव, मासे आणि इतर प्राण्यांच्या आकृत्या आढळतात. यावरून त्या काळातील निसर्गविश्वाची कल्पना येते.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
आजच्या तुलनेत १० हजार वर्षांपूर्वीचं आयुष्य खूप वेगळं होतं. माणसांकडे आधुनिक सुविधा नव्हत्या; पण दगडी हत्यारं बनवणं, अन्न शोधणं, शिकार करणं आणि निसर्गाशी जुळवून घेणं अशी कौशल्यं त्यांनी विकसित केली होती. याच प्रवासातून पुढे मानवी संस्कृतीचा विकास झाला.
Ancient Human Life in Maharashtra
esakal
Weight on Mars
esakal