तुमचं लग्न ठरण्याआधीच होऊ शकतो गेम, महाराष्ट्रात सुरू झाला नवा ट्रेंड

Shubham Banubakode

काळ बदलला

पूर्वी लग्न ठरवताना नातेवाईकांची चौकशी, मुलगा-मुलगी काय करतात आणि पत्रिका जुळते का एवढ्याच गोष्टी पाहिल्या जायच्या. पण आता काळ बदलला आहे.

new Marriage Trend

|

esakal

खासगी गुप्तचर

अनेक कुटुंबे लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची सखोल माहिती तपासण्यासाठी खासगी तपास संस्थांची मदत घेत आहेत.

new Marriage Trend

|

esakal

कुटुंबियांची भावना

खासगी गुप्तचर संस्थांमध्ये प्लीज 'प्री-मॅरिटल बॅकग्राउंड चेकच्या केसेस वाढल्याची माहिती पुढे आली आहे. लग्नापूर्वी काळजी घेण्याची भावना कुटुंबांमध्ये वाढली आहे.

new Marriage Trend

|

esakal

काय तपासलं जातं?

खासगी गुप्तहेर संस्था आता होणाऱ्या वधू किंवा वराची अनेक स्तरांवर माहिती गोळा करत आहेत. त्यात जुन्या मैत्री-संबंधांपासून सोशल मीडिया तपासला जातो आहे.

new Marriage Trend

|

esakal

पडताळणी

बायोडाटामध्ये लिहिलेली माहिती खरी आहे का, हेही तपासले जाते. शिक्षण, कंपनी, पगार, व्यवसाय याबाबत चुकीची माहिती दिली आहे का, याची खात्री केली जाते.

new Marriage Trend

|

esakal

निर्णय

मोठे कर्ज, न्यायालयीन प्रकरणे, आर्थिक वाद किंवा गंभीर व्यसनांची माहिती लपवली असल्यास काही कुटुंबे लग्नाचा निर्णय बदलत आहेत.

new Marriage Trend

|

esakal

कायद्याने गुन्हा?

माजी आयपीएस अधिकारी आणि वकील वाय. पी. सिंग यांच्या मते, सार्वजनिक नोंदी तपासणे किंवा सामान्य माहितीची पडताळणी करणे कायदेशीर आहे.

new Marriage Trend

|

esakal

नवा ट्रेंड

लग्न हा आयुष्यभराचा निर्णय आहे. त्यामुळे योग्य माहिती आणि विश्वासाच्या आधारावर निर्णय घेण्याकडे अनेक कुटुंबांचा कल वाढला आहे.

new Marriage Trend

|

esakal

नवी संकल्पना

बदलत्या काळात ‘प्री-मॅरिटल बॅकग्राउंड चेक’ ही संकल्पना महाराष्ट्रातही वेगाने रूढ होताना दिसत आहे.

new Marriage Trend

|

esakal

IAS अधिकारी परदेश दौऱ्यावर का जाऊ शकत नाहीत? जाणून घ्या खरं कारण

ias

|

esakal

हेही वाचा -