संतोष कानडे
महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं मंदिर नेमकं कुठे आहे, तुम्हाला माहितंय का?
मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तेर येथे असलेलं हे विष्णूचं मंदिर आहे.
हे मंदिर वाकाटक काळातलं आहे. मंदिर चौथ्या शतकातलं असल्याचं सांगितलं जातं.
हे मंदिर चाफाकृती-लंब वर्तुळाकार असून जुन्या बौद्ध लेण्यांप्रणाचे याची रचना आहे.
मंदिर विटांनी बांधलेलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे मंदिर दुर्लक्षित असल्याचं दिसतंय.
असंही म्हटलं जातं की हे बौद्ध स्तूप होतं, पुढे सहाव्या शतकात हे हिंदू मंदिरात रुपांतरित झालं.
भगवान विष्णूच्या त्रिविक्रम अवताराला हे मंदिर समर्पित आहे. त्यामुळे याला त्रिविक्रम मंदिर म्हटलं जातं.
हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुनी उभी असलेली वास्तू मानली जाते. चौथ्या शतकाच्याही आधी हे बांधकाम झाल्याचं सांगितलं जातं.