Sandeep Shirguppe
रायगड जिल्ह्यातील चिरगावात गिधाडांसाठी मागील २५ वर्षांपासून डीजे किंवा बँजो वाजवला जात नाही. याच कारणही रहस्यमय आहे.
Maharashtra Vulture Village
चिरगावातील मागच्या जंगलात गिधाडांनी आपली घरटी बांधली आहेत. त्याना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Vulture Village
अधिवासाचा ऱ्हास, जंगलतोड, अन्नाची कमतरता आणि डायक्लोफेनाकसारख्या औषधांमुळे गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली.
Maharashtra Vulture Village
१९९९-२००० मध्ये रायगडच्या चिरगावात केवळ २२ गिधाडे आणि मोजकीच घरटी शिल्लक होती.
Maharashtra Vulture Village
गिधाडांना घरटी बांधण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळावा, यासाठी पाच वर्षांत सुमारे ५० हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले.
Maharashtra Vulture Village
गिधाडांना पुरेसे अन्न मिळावे यासाठी आसपासच्या गावांमध्ये नेटवर्क तयार करण्यात आले. मृत जनावरांची माहिती संस्थेला देण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.
Maharashtra Vulture Village
अन्नाची कमतरता भासणाऱ्या पिल्लांसाठी मांसाची व्यवस्था केली जात असे. घरट्यातून खाली पडलेल्या पिल्लांना वाचवून त्यांचे संगोपन केले जात असे.
Maharashtra Vulture Village
उन्हाळ्यात गिधाडांच्या घरट्यांवर आणि संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी शाळकरी मुलांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले.
Maharashtra Vulture Village
स्थानिक ग्रामस्थ आणि संवर्धन संस्थांच्या प्रयत्नांमुळे चिरगावातील गिधाडांची संख्या पुन्हा २४९ वर पोहोचली. आता हे गाव गिधाड संवर्धनाचे उदाहरण ठरत आहे.
Maharashtra Vulture Village