Sandip Kapde
राज्यातील अनेक भागांमध्ये ढगांचा गडगडाट होत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
आकाशात अवकाळी पावसाचे ढग दाटून आले.
काल अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
दिवसभर ढगाळ हवामान आणि संध्याकाळी पडलेला पाऊस यामुळे उन्हाळ्यातच पावसाळी वातावरणाची अनुभूती आली.
अवकाळी पाऊस म्हणजे काय असतो आणि तो नेमका का पडतो, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
मान्सून किंवा त्यापूर्वीच्या कालावधीशिवाय जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा त्याला अवकाळी पाऊस म्हणतात.
हा पाऊस सहसा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक येतो आणि त्याची अपेक्षा फार कमी असते.
अनेक वेळा अवकाळी पावसासोबत गारपीटही होते, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते.
अवकाळी पाऊस कशामुळे होतो, याचा देखील आपण अभ्यास करूया.
हवेत पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्यास अवकाळी पावसाची शक्यता अधिक असते.
अवकाळी पावसामुळे चक्रीवादळ आणि गारपीट यासारख्या हवामान बदलांचे प्रमाणही वाढते.