Pranali Kodre
महाराष्ट्रा राज्याला जसे त्याचे राज्यप्राणी, फळ, पक्षी आहे, तसेच राज्य फुलपाखरू देखील आहे.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
महाराष्ट्र राज्याने २०१५ मध्ये 'ब्लू मॉरमॉन' (Blue Mormon) या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा अधिकृत दर्जा दिला. असे करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
'ब्लू मॉरमॉन' (Blue Mormon) चे मराठी नाव 'नीलवंत' किंवा 'राणी पाकोळी' असे आहे. तसेच शास्त्रीय नाव Papilio polymnestor (पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर) आहे.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
'ब्लू मॉरमॉन' हे फुलपाखरू भारतातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकीएक आहे. त्याच्या पखांचा विस्तार होतो, तेव्हा ते १२० ते १५० मिलीमीटर पसरतात. त्यामुळे पक्षी उडतानाचाही भास होतो.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
'ब्लू मॉरमॉन' फुलपाखराचे पंख मखमली काळ्या रंगाचे असतात, ज्यावर आशाळी-निळ्या रंगाच्या छटा असतात. तसेच पंखांच्या खालच्या बाजूला शरीराजवळ लाल लहान ठिपके असतात.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
'ब्लू मॉरमॉन' हे फुलपाखरू भारत आणि श्रीलंका येथेच अढळते. भारतात प्रामुख्याने सह्याद्रीच्या रांगामध्ये, दक्षिण भारतात आणि पूर्व किनारपट्टीवर वावर आहे.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
महाराष्ट्रात प्रमुख्याने विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहाहरित आणि पानगळीच्या जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळते. याशिवाय पुणे-मुंबईसारख्या शहरांतील बागांमध्येही या फुलपाखराचा वावर दिसतो.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
लिंबूवर्गीय झाडांना आकर्षित होत असल्याने या फुलपाखराची मादी प्रामुख्याने लिंबू, संत्रे, पपनस, बेल सारख्या झाडांवर अंडी घालते.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
प्रौढ फुलपाखरू मोगरा, अशोकी, झिनिया अशा फुलांमधील मध पिते. आवश्यक असणारी खनिजे व पोषक तत्वांसाठी नर फुलपाखरू ओल्या चिखलावर किंवा कुजलेल्या फळांवर बसून द्रव शोषतात.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
'ब्लू मॉरमॉन' प्रौढ फुलपाखराचे आयुष्य साधारण १४ दिवसांचे असते.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
हे फुलपाखरू चांगले परागीभवनाचे (Pollination) काम करते. त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या कीटकांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि फुलपाखरांच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्राने त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला.
Blue Mormon : State Butterfly of Maharashtra
Sakal
Marathi Names of Maharashtra Butterflies
Sakal