सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रात सर्वात प्रथम एसटी सेवेला कधी सुरुवात झाली तुम्हाला माहित आहे का?
महाराष्ट्रात एसटी सेवेला कधी आणि कशासाठी सुरवात झाली? जाणून घ्या.
महाराष्ट्रात शासकीय एसटी सेवा म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) सुरुवात १ जून १९४८ रोजी झाली.
पहिली एसटी बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली
शासकीय एसटी सेवा सुरू होण्यापूर्वी, १९३२ च्या सुमारास महाराष्ट्रात खाजगी व्यावसायिकांद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू झाली होती.
१९४८ मध्ये मुंबई राज्यासाठी 'राज्य मार्ग परिवहन मंडळ' (State Road Transport Board) ची स्थापना करण्यात आली, ज्याने एसटी सेवा सुरू केली.
पहिल्या एसटी बसचा रंग निळा होता आणि तिचे छप्पर चंदेरी होते. त्यावेळी तिचे भाडे ९ पैसे प्रति मैल होते.
ग्रामीण आणि दुर्गम भागांना शहरी भागांशी जोडणे, हे एसटी सेवा सुरू करण्यामागे मुख्य उद्दिष्ट होते.
१९५० मध्ये, 'राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम' (State Road Transport Corporations Act, 1950) संमत झाल्यानंतर, एसटी महामंडळाची औपचारिक स्थापना झाली.