पुजा बोनकिले
पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्रात सी-प्लेन सेवा सुरु करण्यात येणार आहे.
दुर्गम भागातील हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना राबण्यात येणार आहे.
देशभरात दीडशे ठिकाणी सी-प्लेन सेवा सुरु होणार आहे.
यात महाराष्ट्रातील ८ ठिकाणी ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.
उडान ५.५ योजनेत हेलिकॉप्टर आणि सी प्लेन सेवाचा समावेश असणार आहे.
साताऱ्यातील डोम धरण, नाशिक मधील गंगपुर धरणे, नागपुरातील फिणसे धरण, बुलधाण्यातील कोराजी धरण, पुण्यातील पवना धरण, रत्नागिरीतील गणपतीपुळे तर नागपुरातील पेच धरण तसेच बारशिवधनी येथे सी प्लेन सेवा सुरू होणार आहे.