Maharashtra Tourism : अनुभवा स्वर्गसुख! 2000 फूट उंचीवर वसलेलं 'हे' छुपं हिल स्टेशन महाबळेश्वरलाही देतंय टक्कर!

बाळकृष्ण मधाळे

महाराष्ट्रातलं छुपं हिल स्टेशन!

रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या मधोमध वसलेलं एक छुपं हिल स्टेशन सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या पर्यटनस्थळांनाही टक्कर देणारं हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे आंबा.

Amba Ghat Hill Station

|

esakal

आंबा घाट देतोय महाबळेश्वरलाही टक्कर

कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर वसलेलं आंबा हे ठिकाण कोल्हापूरपासून सुमारे ६५ किलोमीटर, तर रत्नागिरीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला 'आंबा घाट' हा एक लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो.

Amba Ghat Hill Station

|

esakal

रत्नागिरी–कोल्हापूरमधील निसर्गाचा खजिना

आंबा घाटातील अनेक गावांमध्ये पर्यटक मुक्काम करतात आणि येथील निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतात. मात्र, या परिसरातील आंबा गाव सर्वाधिक लोकप्रिय ठरलं आहे.

Amba Ghat Hill Station

|

esakal

२,००० फूट उंचीवरील थंड हवेचं स्वर्गसुख

समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० फूट उंचीवर असलेला आंबा घाट हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण मानला जातो.

Amba Ghat Hill Station

|

esakal

धुक्याची चादर अन् हिरव्यागार डोंगर-दऱ्या

आंबा घाटात वर्षभर धुक्याची चादर पसरलेली असते. त्यामुळे घाटातून प्रवास करताना प्रवासी हमखास रस्त्यात थांबून धुक्यात हरवलेले फोटो काढताना दिसतात. हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा घाट अतिशय मनमोहक भासतो.

Amba Ghat Hill Station

|

esakal

उटी–मसुरीचा फिल देणारा घाट

रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या या आंबा घाटातून प्रवास करताना अनेकांना उटी किंवा मसुरीसारख्या हिल स्टेशनचा अनुभव येतो.

Amba Ghat Hill Station

|

esakal

पर्यटकांसाठी परिपूर्ण पर्यटनस्थळ

पश्चिम घाटातील हे छुपं हिल स्टेशन निसर्गप्रेमी आणि शांततेच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक परिपूर्ण पर्यटनस्थळ ठरत आहे.

Amba Ghat Hill Station

|

esakal

Maharashtra Tourism : आयुष्यात एकदा तरी इथं फिरलाच पाहिजे! महाराष्ट्रातील टॉप 10 ठिकाणं पाहून थक्क व्हाल

Maharashtra Tourism

|

esakal

येथे क्लिक करा...