सकाळ डिजिटल टीम
नाशिकमधील कपालेश्वर मंदिर हे जगातील एकमेव शिवमंदिर मानले जाते, जिथे महादेवाचं दर्शन नंदीशिवाय होतं. यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत जाणून घ्या.
पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने एकदा ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक कापलं होतं. यामुळे शिवाला ब्रह्महत्येचं (ब्राह्मणाची हत्या करण्याचं) पातक लागलं.अशी मान्यता आहे.
या पातकातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिव अनेक ठिकाणी भटकले, पण त्यांना कुठेही शांती मिळाली नाही. असे म्हंटले जाते.
भटकंती करत असताना शिव नाशिकमध्ये पोहोचले, जिथे गोदावरी नदीच्या रामकुंडाजवळ एका गायीने (नंदीचा अवतार) वासराला जन्म दिला.
याच ठिकाणी, नंदीने गायीच्या रूपात शिवाला ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी गोदावरी नदीतील रामकुंडात स्नान करण्याचा सल्ला दिल्याची मान्यता आहे.
नंदीच्या सल्ल्यानुसार शिवाने रामकुंडात स्नान केले आणि ते पापमुक्त झाले. या घटनेमुळे शिवाने नंदीला आपला गुरु मानल्याचे म्हंटले जाते.
हिंदू परंपरेनुसार, शिष्य आपल्या गुरुसमोर बसत नाही. नंदीला गुरु मानल्यामुळे, शिवाने नंदीला आपल्यासमोर बसण्यास मनाई केली. अले म्हंटले जाते.
याच ठिकाणी, शिवाने स्वतः कपालेश्वर लिंगाची स्थापना केली आणि येथेच वास्तव्य केले, जिथे नंदी त्यांच्यासमोर नाहीत.
त्यामुळे, कपालेश्वर मंदिर हे जगातील एकमेव असे शिवमंदिर आहे जिथे शिवासमोर नंदीची मूर्ती नाही, कारण नंदीने येथे गुरुची भूमिका बजावली होती. असे म्हंटले जाते.