मतदार vs उमेदवार: विधान परिषदेचा डोके चक्रावून टाकणारा कायदेशीर पेच!

विनयन वाघमारे

फेरी १: शिक्षणाची अट

मतदार: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा डी.एड./बी.एड. असणे कायद्याने सक्तीचे.

उमेदवार: निरक्षर असला किंवा कधीही शाळेत गेला नसला तरी त्याला निवडणूक लढवण्याची पूर्ण मुभा असते.

Election

|

Sakal

फेरी २: अनुभवाचा निकष

मतदार: पदवी मिळून किंवा शाळेत शिकवून किमान ३ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार मिळत नाही.

उमेदवार: कामाचा, समाजकारणाचा किंवा शिकवण्याचा एक दिवसाचाही अनुभव असण्याची गरज नसते.

Election

|

Sakal

फेरी ३: कागदपत्रांची पडताळणी

मतदार: फॉर्म १८ किंवा १९ भरून मुख्याध्यापक अथवा राजपत्रित अधिकाऱ्यांचे सही-शिक्के जोडावे लागतात.

उमेदवार: केवळ मतदारसंघातील १० नोंदणीकृत मतदारांच्या स्वाक्षऱ्या (सूचक) अर्जावर असणे पुरेसे ठरते.

Election

|

Sakal

फेरी ४: वयाची मर्यादा

मतदार: पदवीनंतर ३ वर्षांची अट पूर्ण करणारा तरुण वयाच्या २१ ते २४ व्या वर्षी मतदान करू शकतो.

उमेदवार: विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ३० वर्षे पूर्ण असावे लागते.

Election

|

Sakal

फेरी ५: प्रचाराची व्याप्ती

मतदार: एका मताने सुशिक्षित प्रतिनिधी निवडण्याची आशा बाळगतो.

उमेदवार: ५ ते ६ जिल्ह्यांत पसरलेल्या अथांग मतदारसंघात स्वतःची पोहोच ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची यंत्रणा आणि संस्थांचे जाळे राबवतो.

Election

|

Sakal

कोर्टाने हा भेद का मान्य केला?

संविधानाचा हेतू सुशिक्षितांनी निवडलेला प्रतिनिधी असा आहे. उमेदवारावर बंधने लादून सुजाण मतदारांचे प्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य संविधानाला मर्यादित करायचे नव्हते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.

Election

|

Sakal

निकालात संस्थाचालक पुढे!

संविधानाने सुशिक्षित मतदारांना स्वातंत्र्य दिले, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत संस्थाचालक, शिक्षणसम्राट आणि राजकीय ताकदीने या जागा स्वतःच्या प्रभावाखाली आणल्या, हे जमिनीवरील कटू वास्तव आहे.

Election

|

Sakal

यंदा मताची ताकद दाखवून द्या!

संविधानाने दिलेला अधिकार ओळखा; घराबाहेर पडून योग्य आणि प्रामाणिक प्रतिनिधीलाच पहिली पसंती देऊन मतदान करा. ही विश्लेषणात्मक माहिती सर्व सुशिक्षित मतदारांपर्यंत नक्की पोहोचवा!

Election

|

Sakal

शिक्षकांचा नेता... पण स्वतः कधी शाळेत गेला नाही तरी चालतो! जाणून घ्या... संविधानाचा अजब खेळ

Teacher

|

Sakal

इथे क्लिक करा...