मतदानाला जाताय? 'ही' १ चूक झाली तर मत बाद ठरेल!

विनयन वाघमारे

निवडणूक केंद्रावर मिळणारा अधिकृत पेन

स्वतःचा बॉलपेन, जेलपेन किंवा पेन्सिल वापरल्यास मत अवैध ठरते. मतदान केंद्रात अधिकारी जो अधिकृत जांभळा स्केच पेन देतील, केवळ त्याच पेनने पसंतीक्रम लिहावा.

Election

|

Sakal

शिक्का न मारता पसंतीक्रम नोंदवणे

मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारू नका किंवा बरोबरची (✔) खूण करू नका. तिथे फक्त पसंतीक्रम दर्शवणारे १, २, ३ असे आकडेच लिहायचे असतात.

Election

|

Sakal

पहिली पसंती (१) देणे अनिवार्य

तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर '१' हा आकडा लिहावाच लागतो. पहिली पसंती न नोंदवता थेट '२' किंवा '३' आकडा लिहिल्यास मतपत्रिका थेट बाद ठरते.

Election

|

Sakal

एकाच पसंतीचे दोन उमेदवार नकोत

दोन वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावासमोर एकच पसंती क्रमांक लिहू नका. दोघांनाही '१' किंवा '२' लिहिल्यास मतपत्रिका लगेच रद्द होते. प्रत्येकाला स्वतंत्र पसंतीक्रम द्या.

Election

|

Sakal

अंकांचे प्रकार (देवनागरी, इंग्रजी, रोमन)

पसंतीक्रम नोंदवताना भारतीय देवनागरी (१, २, ३), आंतरराष्ट्रीय इंग्रजी (1, 2, 3) किंवा रोमन (I, II, III) अंक चालतात. अक्षरात (उदा. 'एक', 'दोन') लिहू नये.

Election

|

Sakal

मतपत्रिकेवर नाव किंवा सही न करणे

मतपत्रिकेवर कुठेही स्वतःचे नाव, सही, अंगठा किंवा खूण करू नका. मतदाराची ओळख उघड झाल्यास मतदानाची गोपनीयता भंगली म्हणून मत त्वरित अवैध ठरवले जाते.

Election

|

Sakal

मतपत्रिका घडी घालून मतपेटीत टाकणे

पेनची शाई पसरून दुसऱ्या रकान्यात लागू नये म्हणून केंद्रावरील सूचनेनुसार मतपत्रिकेला प्रथम उभी आणि नंतर आडवी अशी घडी घालूनच मतपेटीत टाका.

Election

|

Sakal

मतदानाचा हक्क बजावा

आपला मतदानाचा हक्क जबाबदारीने बजावा आणि मत बाद होऊ देऊ नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत नक्की शेअर करा.

Election

|

Sakal

आमदारकी नको, पण 'गोकुळ' हवं! कोल्हापूरच्या या दूध संघात दडलंय तरी काय?

Gokul

|

Sakal

इथे क्लिक करा...