Shubham Banubakode
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चौंढाळा गावात गेल्या ५०० वर्षांत एकही लग्न झालेलं नाही. आजही गावात नवरी-नवरदेवाच्या दारात मांडव पडत नाही.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
गावातील मुला-मुलींची लग्न गावाबाहेर, काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरात बजरंग बलीच्या साक्षीने पार पडतात.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
आख्यायिकेनुसार, रेणुका मातेचं लग्न नाकारल्यामुळे वऱ्हाड दगडात रूपांतरित झालं. त्यामुळे देवी अविवाहित राहिल्याचा मान ठेवत गावात लग्न होत नाहीत.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
या कथेशी संबंधित गोलाकार दगड आजही गावाच्या परिसरात हजारोंच्या संख्येने पडलेले आहेत. त्यांचा कोणताही वापर केला जात नाही.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
गावातील रेणुका देवी मंदिराच्या उंचीपेक्षा उंच घर बांधण्यास मनाई आहे. त्यामुळे चौंढाळा गावात एकही दुमजली घर नाही.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
संपूर्ण गावात खाट, बाज, पलंग किंवा सोफा आढळत नाही. बाळंतीण महिलांसह सर्वजण जमिनीवरच झोपतात.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
शेतात राबणाऱ्या बैलांना शिंगोट्या किंवा झुल घातली जात नाही. परंपरेचे नियम माणसांसोबत जनावरांनाही लागू आहेत.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
सातव्या माळेला रेणुका मातेची भव्य यात्रा भरते. छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
Maharashtra Village With No Marriages for 500 Years
esakal
Maharashtra’s Completely Vegetarian Village
esakal