महाराष्ट्रातील शाकाहारी गाव, नव्या सूनबाईलाही पाळवा लागतो नियम...

Shubham Banubakode

संपूर्ण शाकाहारी गाव

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेलं रेणावी हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे. गावात मांसाहारावर पूर्ण बंदी असून सर्व जाती-धर्मांचे लोक ही परंपरा श्रद्धेने पाळतात.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

अठरापगड जातींचा एकोपा

रेणावी गावात अठरापगड जाती-धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. धार्मिक विविधता असूनही शाकाहार ही गावाची सामूहिक ओळख आहे.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

रेवागिरी डोंगररांग

सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगेतील रेवागिरी ही डोंगररांग विटा शहराच्या पूर्वेस पसरलेली आहे. डोंगरदऱ्या, दाट वनराई आणि शांत वातावरण रेणावीला निसर्गरम्य बनवतात.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

पवित्र तीर्थक्षेत्र

रेणावी येथे असलेले श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ मानले जाते. दगडी बांधकामातील भव्य मंदिर, उत्तराभिमुख रचना आणि भारावून टाकणारे वातावरण भाविकांना आकर्षित करते.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

भाकणुकीचे विशेष महत्त्व

रेवणसिद्ध मंदिरातील भाकणुकीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दूरदूरवरून भाविक या भाकणुकीसाठी रेणावीला येतात.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

महाशिवरात्रीची भव्य यात्रा

महाशिवरात्रीपासून सुरू होणारी रेवणसिद्धाची यात्रा दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या यात्रांपैकी एक आहे. या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

लग्नापूर्वी शाकाहाराची अट

रेणावी गावात लग्न करून येणाऱ्या सुनेलाही शाकाहार पाळण्याबाबत आधीच विचारणा केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा काटेकोरपणे जपली जाते.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

नवनाथांची परंपरा

रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक असून नवनाथ शाकाहारी होते. त्यांच्या विचारांची परंपरा पुढे नेत रेणावी गावाने कायमस्वरूपी शाकाहाराचा मार्ग स्वीकारला आहे.

Maharashtra’s Completely Vegetarian Village

|

esakal

जिथं हत्तीही होते शिल्पकार...८०० वर्ष जुनं लासूरचं रॉक-कट आनंदेश्वर मंदिर एकदा बघाच!

Lasur Anandeshwar Temple |

esakal

हेही वाचा -