Shubham Banubakode
मुघल साम्राज्य वाढवण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला माणगंगेच्या पुराचा चांगलाच फटका बसला होता.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य सहज जिंकू, असा औरंगजेबाचा समज होता. लाखोंची फौज घेऊन तो महाराष्ट्रात उतरला.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या खवासपूर गावाजवळ माणगंगा नदीच्या कोरड्या पात्रात औरंगजेबाच्या सैन्याने छावणी टाकली होती.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
माणगंगा साधारणपणे कोरडीच असायची. त्यामुळे नदीच्या पात्रात छावणी असूनही औरंगजेबाच्या सैनिकांना कोणताही मोठा धोका वाटत नव्हता.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
पण रात्री जोरदार पाऊस झाला आणि अचानक माणगंगेला पूर आला. झोपलेल्या मुघल छावणीत पाणी घुसल्याने एकच धावपळ उडाली.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
अचानक आलेला गोंधळ पाहून मराठ्यांनी हल्ला केला असावा, असा संशय औरंगजेबाला आला. जीव वाचवण्यासाठी तो अंधारात सैरावैरा धावू लागला.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
पळताना औरंगजेबाचा पाय घसरला आणि त्याचा उजवा गुडघा दगडावर जोरात आदळला. गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कायमचा लंगडा झाला.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
मराठा साम्राज्य संपवण्याच्या हट्टाने आलेल्या औरंगजेबाला अखेर महाराष्ट्रातच मोठे धक्के बसले. १७०७ मध्ये याच भूमीत त्याचा शेवट झाला.
Aurangzeb Became Lame in Maharashtra
esakal
Shah Jahan and Mumtaz Mahal
esakal