Yashwant Kshirsagar
पायी वारी करताना थकवा, अपचन, गारठा असे त्रास होतात. यावर 'आलं' हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
झोपण्यापूर्वी आल्याचा रस आणि अर्धा चमचा मिरीपूड घ्या. यामुळे मन शांत होते व चांगली झोप येते.
आल्याच्या फोडीवर सैंधव मीठ टाका. ते हळूहळू चोखा. लगेच ढेकर येतील आणि पोट हलके वाटेल.
बारीक आले, काळे मीठ आणि लिंबाचा रस एकत्र घ्या. हे मिश्रण पचन सुधारते.
१ लिटर पाण्यात २ इंच आले टाकून उकळा आणि प्या. यामुळे आळस, अंगदुखी आणि सांधेदुखी दूर होते.
दिवसातून २-३ वेळा १-२ चमचे ताज्या आल्याचा रस घ्या. यामुळे पोटात साचलेले पाणी कमी होण्यास मदत होते.
ताज्या आल्याचा रस, अर्धा चमचा ताजे तूप आणि चवीनुसार साखर एकत्र करा. हे मिश्रण दम्यावर खूप फायदेशीर ठरते.
आलं आणि लसूण यांचा रस समान प्रमाणात घ्या. तो हात-पायांना चोळा. गारठा कमी होईल.
ताज्या आल्याच्या रसात थोडासा हिंग मिसळा. हे मिश्रण हळूवार चोळा. तुम्हाला नक्की आराम मिळेल!