Stuffed Mirchi Vada: खास महाराष्ट्रीयन स्टाईल स्पेशल भरली मिरची वडा एकदा नक्की ट्राय करा

Monika Shinde

मिरची वडा

गरमागरम, खमंग आणि तिखट चवदार असा मिरची वडा हा सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता आहे. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खायला विशेष मजा येते.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

रेसिपी

या रेसिपीसाठी लागतात जाड हिरव्या मिरच्या, उकडलेले बटाटे, आलं-लसूण, कोथिंबीर, डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ. साहित्य साधं पण चव अप्रतिम.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

मिरच्या स्वच्छ धुवून घ्या

प्रथम मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. देठ आणि शेंडा थोडा ठेवून मध्ये उभा छेद द्या. आतल्या बिया काढल्याने तिखटपणा कमी होतो.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

उकडलेले बटाटे

उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या. तेलात हळद, आलं-लसूण परतून त्यात बटाटे, मीठ घालून छान भाजी तयार करा.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

चविष्ट भाजी

भाजी गार झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि ऐच्छिक लिंबूरस घाला. ही चविष्ट भाजी छेद दिलेल्या मिरच्यांमध्ये भरून मिरच्या नीट बंद करा.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

डाळ, तांदळाचे पीठ

डाळीच्या पिठात मीठ, तिखट, हळद आणि तांदळाचे पीठ घालून मध्यमसर घोळ तयार करा. पाणी घालताना गाठी राहू देऊ नका.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

मध्यम आचेवर तळा

भरलेल्या मिरच्या तयार घोळात पूर्ण बुडवा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

Stuffed Mirchi Vada Recipe

|

esakal

सर्व्ह करा

खमंग, कुरकुरीत मिरची वडा तयार! सॉसबरोबर किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा. वेगळी चटणी न लागता हा वडा तोंडाला पाणी आणतो.

Rice Paper Omelette Recipe: नॉर्मल अंड्याला टाटा! ब्रेकफास्टसाठी बनवा राइस पेपर ऑमलेट

येथे क्लिक करा