Monika Shinde
सण, शुभकार्य, किंवा खास दिवशी पुरणपोळी ही महाराष्ट्रीयन घरात हमखास बनते. गोडसर चव, तूप, आणि कटाची आमटी ही खासियत आजही टिकून आहे.
पुरणपोळीचे दोन मुख्य प्रकार साखरेचं आणि गुळाचं. साखर किंवा गूळ घालून चणाडाळीचं पुरण तयार केलं जातं, आणि त्यापासून पोळी भरून भाजली जाते.
पुरणपोळी केवळ गोड पदार्थ नाही, ती कटाच्या आमटीबरोबर खाल्ल्यास अधिक चवदार लागते. काही जण ती तूप किंवा दूधासोबतही आवडीने खातात.
तेलपोळी ही पुरणपोळीचा एक प्रकार. खूप पातळ, तेलकट आणि दीर्घकाळ टिकणारी ही पोळी सणासुदीशिवाय देखील खाल्ली जाते.
दक्षिण भारतात पुरण तेच, पण पोळी नारळाच्या दुधासोबत खातात. आमटीत कढीलिंब आणि नारळाचं दूध वापरून वेगळीच चव मिळते.
गुजरातमध्ये पोळी पुर्यासारखी लहान असते आणि ती तूप व दूधासोबत खाल्ली जाते. इथे पुरणपोळी ही एक गोड पाककृती मानली जाते.
खवापोळीमध्ये चणाडाळीचं पुरण नसून खवा, साखर, दूध आणि रवा वापरला जातो. ही पोळी मलईदार बासुंदीसोबत खाल्ली जाते अप्रतिम चव!
पुरणपोळीचे कितीही प्रकार असले, तिच्या चवीत आणि आठवणीत एक गोडपणा कायम राहतो. ही केवळ पोळी नाही, तर घराघरातली एक खास भावना आहे.