महाराष्ट्राचा 'असा' बाहेर आला खरा इतिहास! १०० वर्षानंतरही का घेतलं जातंय या महान संशोधकाचे नाव?

Vinayan

महाराष्ट्राचा 'असा' बाहेर आला खरा इतिहास!

आज आपल्याला आपला इतिहास अगदी सहज वाचायला मिळतो, पण हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी महर्षी वि. का. राजवाडे यांनी जी अफाट पायपीट केली, त्याची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे!

History

|

Sakal

१०० वर्षे झाली, पण आजही ते का आठवतात?

३१ डिसेंबर १९२६ रोजी काळाने ज्या महान ऋषितुल्य संशोधकाला आपल्यापासून हिरावून घेतले, त्यांच्या निधनास ३१ डिसेंबर २०२६ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. शंभर वर्षे लोटली तरी त्यांना मागे टाकेल असा इतिहासकार अजून निर्माण व्हायचा आहे!

History

|

Sakal

'मराठ्यांच्या इतिहासची साधने' - एक अमूल्य ठेवा

"नो डॉक्युमेंट्स, नो हिस्टरी" या तत्त्वावर भर देत त्यांनी तब्बल २२ खंड संपादित केले. मूळ कागदपत्रांपेक्षा त्यांनी जोडलेल्या विस्तृत प्रस्तावना मराठी साहित्यात अजोड मानल्या जातात.

History

|

Sakal

हजारो मैलांची पायपीट आणि अफाट संघर्ष

कसलीही आधुनिक साधने नसताना, त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ऐतिहासिक साधनांचा शोध घेतला. गावोगावी, जुन्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन मोडी कागदपत्रे व जुनी दप्तरे स्वतःच्या पायाने फिरून गोळा केली.

History

|

Sakal

केवळ इतिहासच नव्हे, तर भाषा आणि समाजशास्त्र!

राजकारण आणि इतिहासासोबतच मराठी भाषाशास्त्र, व्युत्पत्तीकोश, व्याकरण आणि समाजशास्त्र यावरही त्यांनी बहुविध विषयांवर व्यासंगपूर्ण लेखन केले. त्यांचे 'मराठी धातुकोश' हे कार्य अत्यंत मोलाचे आहे.

History

|

Sakal

'भारत इतिहास संशोधक मंडळा'ची स्थापना

पुणे शहरात १९१० मध्ये त्यांनी 'भारत इतिहास संशोधक मंडळा'ची स्थापना केली. इतिहास हा केवळ राजांचा नसून भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन आहे, हा विचार त्यांनी मांडला.

History

|

Sakal

संसारापेक्षा इतिहासाशी जुळलेले नाते

अकाली पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी कधीही दुसरा विचार केला नाही. स्वतःला कुठल्याही प्रापंचिक पाशात न गुंतवता, 'इतिहाससंशोधन हेच आयुष्याचे एकमेव ध्येय' मानून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.

History

|

Sakal

शतकोत्तर आदरांजली!

इंग्रजीतून लिहून मोठी जागतिक मान्यता मिळवण्याचा मोह टाळून, त्यांनी आपले संपूर्ण संशोधन फक्त मराठीसाठीच केले. आज त्यांच्या स्मृतीला शतशत नमन! हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, नक्की सांगा.

History

|

Sakal

सूचना

History

|

Sakal

समुद्राच्या तळाशी लपलेला सर्वात घातक शिकारी! जो चक्क बाण सोडून शिकार करतो, त्याचे हे भयंकर रहस्य माहितीये का?

Cone Snail

|

Sakal

हे जाणून घ्या !