Monika Shinde
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. ते भारताचे प्रमुख स्वातंत्र्यसेनानी होते.
गांधीजींना संपूर्ण देश आणि जग ‘महात्मा गांधी’ आणि प्रेमाने ‘बापू’ म्हणून ओळखतात. पण तुम्हाला माहित आहे का, त्यांचे पूर्ण नाव काय आहे?
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. ‘महात्मा’ हा आदरार्थ दिलेला उपनाम आहे, ज्याचा अर्थ ‘महान आत्मा’ असा होतो.
1917 मध्ये बिहारमधील चंपारण सत्याग्रहात गांधीजींनी नेतृत्व केले. तेव्हा स्थानिक शेतकरी राजकुमार शुक्ला यांनी त्यांना ‘महात्मा’ म्हणायला सुरुवात केली.
‘बापू’ हे नाव त्यांच्या अनुयायांमध्ये अत्यंत प्रेमळ आणि आदराने वापरले जाते. ‘बापू’ म्हणजे ‘वडील’ किंवा ‘प्रेमळ पिता’ असा अर्थ होतो.
1944 मध्ये गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओवर त्यांना ‘बापू’ म्हणून संबोधले, ज्यामुळे हे नाव अधिक प्रसिद्ध झाले.
‘बापू’ हे नाव लोकांच्या मनात गांधीजींसाठी आदर, प्रेम आणि एकात्मतेचा प्रतीक आहे. त्यामुळे ते सर्वत्र प्रेमाने वापरले जाते.