Monika Shinde
नवरात्र म्हणजे नऊ दिवस शक्तीची आराधना. देवीच्या पूजेमध्ये काही खास परंपरा आहेत. त्यातीलच एक आहे देवीसमोर भोपळा फोडण्याची अनोखी परंपरा.
भोपळा फोडणं हे केवळ विधी नाही, तर त्यामागे गूढ अर्थ आहे. हे पाप, अहंकार, आणि वाईट शक्तींच्या नाशाचं प्रतीक मानलं जातं.
देवीसमोर फोडण्यासाठी वापरतात पांढऱ्या रंगाचा भोपळा.
भोपळा हा अष्टमी किंवा नवमी दिवशी फोडतात, तर काही भागांत घटस्थापनेनंतर किंवा देवीची मूर्ती विसर्जनाच्या आधीही भोपळा फोडतात.
भोपळा फोडणं म्हणजे आतल्या नकारात्मकतेचा नाश. जे देवीसमोर फोडलं जातं, ते भक्ताच्या जीवनातील वाईट शक्तींना दूर करतं, असं मानतात.
पूर्वी बलिदान दिलं जात होतं, आता त्याची जागा भोपळ्याने घेतली आहे. ही बदललेली परंपरा अजूनही श्रद्धेने पाळली जाते.
घरी देवीची पूजा करताना भोपळा पूर्ण फोडत नाहीत. त्यावर हळद-कुंकू लावून एक छोटासा भाग अर्पण केला जातो भक्तिभावाने.