Monika Shinde
आज २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्म दिवस आहे. गांधी जयंती निमित्त जाणून घेऊयात कोण कोणते वृत्तपत्रे काढली आहेत.
महात्मा गांधी यांनी फक्त सत्याग्रहच नव्हे, तर पत्रकारितेला देखील समाजजागृतीचे साधन बनवले. त्यांनी विविध वृत्तपत्रांद्वारे लोकांशी थेट संवाद साधला.
1903 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी 'इंडियन ओपिनियन' नावाचं आठवड्याचं वृत्तपत्र सुरू केलं. हे भारतीयांच्या हक्कांसाठी आवाज बनलं.
भारतात आल्यानंतरही गांधीजींनी ‘Indian Opinion’ ला नियमित लेख आणि आर्थिक मदत देत राहिले. ते या वृत्तपत्राशी शेवटपर्यंत जोडलेले राहिले.
1919 मध्ये गांधीजींनी ‘Young India’ हे वृत्तपत्र सुरू केलं. हे स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि राजकीय विचार मांडण्यासाठी वापरलं गेलं.
1919 मध्येच त्यांनी Navjivan हे दुसरं वृत्तपत्र सुरू केलं. यामध्ये त्यांनी ग्रामविकास, खादी, आणि शुद्ध आहार यावर भर दिला.
1933 मध्ये सुरू झालेलं हरिजन हे वृत्तपत्र गांधीजींनी दलित हक्कांसाठी सुरू केलं. यामधून त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी विचार मांडले.