भारतीय नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो का असतो?

सकाळ डिजिटल टीम

चलनी नोटा

आपण आत्तापर्यंत पाहात आलो आहोत की चलनी नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो असतो या मागचे कारणं काय आहे जाणून घ्या.

Mahatma Gandhi

|

sakal 

राष्ट्रपिताचा सन्मान 

महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या जडणघडणीत दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांना राष्ट्रपिता म्हणून असलेला दर्जा आणि त्यांच्या प्रतिचा असलेला आदर व्यक्त करण्यासाठी हे चित्र नोटांवर छापले जाते. 

Mahatma Gandhi

|

sakal 

प्रतीकात्मक मूल्य

गांधीजींचे चित्र देशाची शांतता, एकता आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते, जे भारतीय चलनावर प्रतिबिंबित होते. 

Mahatma Gandhi

|

sakal 

सुरक्षितता

१९४९ मध्ये सुरुवातीला नोटांवर अशोक स्तंभाचा फोटो वापरण्याची योजना होती, पण १९४९ मध्ये १ रुपयाची नवीन नोट जारी करण्यात आली. 

Mahatma Gandhi

|

sakal 

आश्रमाचा फोटो

१९६९ मध्ये महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या चित्रासह सेवाग्राम आश्रमाचा फोटो छापण्यात आला. १९८७ पासून त्यांचे चित्र नियमितपणे नोटांवर दिसू लागले. 

Mahatma Gandhi

|

sakal 

बनावट नोटा

नोटांवर गांधीजींचा चेहरा छापल्यामुळे बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण झाले, कारण मानवी चेहऱ्याची प्रतिकृती बनवणे निर्जीव चित्रांपेक्षा अधिक अवघड असते.

Mahatma Gandhi

|

sakal 

ऐतिहासिक महत्त्व

गांधीजींचा फोटो हे एका विशिष्ट ऐतिहासिक काळाचे प्रतिनिधित्व करतो, कारण हा फोटो १९४६ मध्ये काढण्यात आला होता, जेव्हा गांधीजी म्यानमारच्या सचिवासोबतच्या भेटीदरम्यान व्हाईसरॉय हाऊसमध्ये होते. 

Mahatma Gandhi

|

sakal 

RBI समितीचा निर्णय

RBI आणि केंद्र सरकारने वेळोवेळी स्थापन केलेल्या समित्यांनी हा निष्कर्ष काढला आहे की, गांधीजींपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे देशाचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे व्यक्तिमत्त्व नाही.

Mahatma Gandhi

|

sakal 

आंतरराष्ट्रीय ओळख

जागतिक स्तरावर गांधीजींना शांतता आणि अहिंसेचे दूत म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे भारतीय चलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मजबूत ओळख मिळते.

Mahatma Gandhi

|

sakal 

गांधीजींच शिक्षण काय झालं आहे?

येथे क्लिक करा