Mansi Khambe
२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे महात्मा गांधी यांचा जन्म झाला. मोहनदास करमचंद गांधी असे त्यांचे मुळ नाव असून ते भारताच्या इतिहासातील आदरणीय नेते, अहिंसक प्रतिकार व नागरी हक्कांचे जागतिक प्रतीक आहेत.
Mahatma Gandhi Rare Photos
Esakal
गांधींचे स्मरण जगभरात शांततेचे पुरस्कर्ते, नैतिक नेतृत्वाचे प्रतीक आणि भारतातील 'राष्ट्रपिता' म्हणून केले जाते.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
त्यांचा जन्मदिवस, २ ऑक्टोबर, भारतात 'गांधी जयंती' म्हणून आणि जागतिक स्तरावर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
सोशल मीडियावर महात्मा गांधी यांचे १९४४ मधील मुंबईतील जुहू बीचवरील काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये गांधी त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून जुहू बीचवर फेरफटका मारत असल्याचे दिसत आहे.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
मे १९४४ मध्ये आशियाई तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा गांधी प्रकृती स्वास्थ्यासाठी मुंबईच्या जुहू बीच जवळील एका बंगल्यात वास्तव्यास होते.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
गांधीजी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी जुहू बीचवर फिरण्यासाठी जात असत. चालताना ते सहसा त्यांच्या सहकाऱ्यांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या खांद्यांचा आधार घेत असत.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
तसेच महात्मा गांधी यांचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महात्मा गांधी त्यांचे पुत्र देवदास यांच्यासोबत मुंबईतील जुहू बीचवर बसल्याचे दिसत आहे.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
जुहू बीचवर गांधीजींचे हे आणि खुर्चीवर बसून समुद्राकडे पाहत असलेले प्रसिद्ध फोटो त्यांचे पुतणे आणि प्रसिद्ध छायाचित्रकार कनू गांधी यांनी टिपले होते, अशी माहिती आहे.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
महात्मा गांधी यांनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत काम केले; तिथे त्यांना वर्णभेद आणि अन्यायाचा सामना करावा लागला.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
१९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर, गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) एक प्रमुख नेते बनले. त्यांनी भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करण्यास आणि ब्रिटिश उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन देत 'स्वदेशी'चा पुरस्कार केला.
Mahatma Gandhi Rare Photos
ESakal
House Build
ESakal