पुणे नाही मुंबई जवळच्या या किल्ल्यावर गेले आहे शिवरायांचे बालपण

Sandip Kapde

ऐतिहासिक

माहुली किल्ला हा शिवरायांच्या बालपणाच्या आठवणींनी भारलेला ऐतिहासिक किल्ला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संघर्ष

शहाजीराजे आणि मोगल यांच्यातील संघर्षामुळे शिवराय व जिजाऊंना माहुली किल्ल्यावर ठेवण्यात आले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जीवनशैली

बालशिवरायांनी माहुलीवर रयतेच्या जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जिजाऊ

या काळात जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याच्या संकल्पनेची बीजे रुजवली.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

ठाणे

माहुली किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असून त्याची उंची २८१५ फूट आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

निजामशहा

अहमदनगरच्या निजामशहाने १४८५ मध्ये माहुली किल्ला जिंकला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शहाजीराजे

१६३६ मध्ये शहाजीराजे माहुलीवर आले पण मोगलांच्या वेढ्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मोगल

८ जानेवारी १६५८ रोजी शिवरायांनी माहुली किल्ला मोगलांकडून जिंकला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

पुरंदर

१६६६ च्या पुरंदर तहानंतर माहुली पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

छापा

महाराजांनी १६७० मध्ये माहुलीवर छापा टाकण्याचा प्रयत्न केला, पण मनोहरदास गौंडमुळे तो अपयशी ठरला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

किल्लेदारी

मनोहरदासाने माहुलीची किल्लेदारी सोडल्यावर अलाबदी बेग त्याच्या जागी आला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मराठ्यांचे निशाण

त्याच वर्षी शिवरायांनी पुन्हा हल्ला करून माहुलीवर मराठ्यांचे निशाण फडकवले.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

किल्ला

इ.स. १८१७ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला, नंतर इंग्रजांनी तो जिंकला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

हरिश्चंद्रगड

माहुलीच्या पूर्वेस हरिश्चंद्रगड व दक्षिणेस माथेरान असे निसर्गरम्य स्थळे आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

इतिहास

शिवपदस्पर्शाने पावन झालेल्या माहुली किल्ल्याचा इतिहास अद्याप मराठा सामर्थ्याचे प्रतीक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शिवरायांना प्रत्यक्ष पाहणारी विदर्भातील माहुरची 'सावित्रीबाई'

Shivaji Maharaj and Raybaghan historic encounter | esakal
येथे क्लिक करा