Aarti Badade
बाहेरचा पनीर पफ खाण्याऐवजी आता घरच्या घरीच खुसखुशीत आणि चविष्ट पनीर पफ तयार करा. ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
bakery style paneer puff
Sakal
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून एक मिनिट परतून घ्या.
bakery style paneer puff
Sakal
आता चिरलेली ढोबळी मिरची घालून काही मिनिटे शिजवा. त्यानंतर हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा.
bakery style paneer puff
Sakal
या मिश्रणात पनीरचे छोटे तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर घाला. दोन मिनिटे परतून गॅस बंद करा आणि स्टफिंग पूर्णपणे थंड होऊ द्या.
bakery style paneer puff
Sakal
पफ पेस्ट्री शीट मऊ झाल्यावर चौकोनी तुकडे करा. प्रत्येक तुकड्याच्या मध्यभागी तयार केलेले पनीर स्टफिंग ठेवा.
bakery style paneer puff
Sakal
पेस्ट्री दुमडून काट्याच्या साहाय्याने कडा हलक्या दाबून बंद करा. यामुळे बेक करताना स्टफिंग बाहेर येणार नाही.
bakery style paneer puff
Sakal
तयार पफवर ब्रशने थोडे दूध लावा. ओव्हन 200°C वर प्रीहीट करून पफ 20 ते 25 मिनिटे किंवा सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत बेक करा.
bakery style paneer puff
Sakal
तयार पनीर पफ टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा आणि घरच्यांसोबत बेकरीसारख्या चवीचा आनंद घ्या.
bakery style paneer puff
Sakal
coffee for skin
Sakal