घरच्या घरी बनवा KFC स्टाईल कुरकुरीत चिकन!

Aarti Badade

नॉनव्हेज प्रेमींसाठी खास रेसिपी

KFC सारखा चवदार चिकन पॉपकॉर्न आणि ड्रमस्टिक्स आता घरच्या घरी बनवा – झटपट आणि कुरकुरीत!

Homemade KFC Fried Chicken | Sakal

चिकन मॅरिनेशनसाठी लागणारी सामग्री

अर्धा किलो चिकन ड्रमस्टिक्स,1 लिंबाचा रस,1 चमचा आलं-लसूण पेस्ट,1 चमचा लाल तिखट, ½ चमचा हळद, ½ चमचा जिरे-धणे पावडर,मीठ चवीनुसार

Homemade KFC Fried Chicken | Sakal

मॅरिनेशन करताना लक्षात ठेवा

सर्व साहित्य एकत्र करून चिकन मॅरिनेट करा. *किमान 1 तास, पण 5 तास ठेवल्यास अधिक चवदार.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

कुरकुरीत आवरणासाठी साहित्य

1 वाटी मैदा,1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर,1 चमचा लसूण पावडर,1 चमचा चिली फ्लॅक्स,मीठ चवीनुसार,पाणी.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

आवरणाचे मिश्रण तयार करा

वरील सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ भिजवा. हे चिकनला कुरकुरीत बनवते.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

चिकनला पीठात बुडवा

मॅरिनेट केलेले चिकन या भिजवलेल्या मिश्रणात व्यवस्थित बुडवून घ्या.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

मध्यम आचेवर तळा

गरम तेलात चिकन ड्रमस्टिक्स मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

घरगुती KFC चिकन तयार!

तयार चिकन ड्रमस्टिक्स गरमागरम मेयॉनीज, सॉस किंवा तंदुरी चटणीसोबत सर्व्ह करा.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

पॉपकॉर्नसाठी

हीच रेसिपी वापरून छोट्या तुकड्यांतून स्वादिष्ट चिकन पॉपकॉर्नही बनवता येतो.

Homemade KFC Fried Chicken | Sakal

वडापावप्रेमींनो! नाशिकचे हे फेमस ठिकाण तुम्ही पाहिलं का?

vada pav | sakal
येथे क्लिक करा