Anushka Tapshalkar
इंदोरी पोहे त्यांच्या हलक्या, गोडसर, तिखट आणि आंबट चवीसाठी लोकप्रिय आहेत. त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी बनवता येणारी ही सहज आणि सोपी डिश नक्की ट्राय करा.
पोहे, हळद, मीठ, साखर, तेल, मोहोरी, बडीशेप, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जीरावन मसाला, डाळिंब, मसाला बुंदी आणि शेव
सर्वप्रथम पोहे एका चाळणीत घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. नंतर त्यातले पाणी पूर्ण गाळून थोडावेळ भिजत ठेवा.
आता या पोह्यांमध्ये हळद, साखर आणि मीठ घालून हलक्या हाताने एकत्रित मिश्रण करून घ्या.
एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. त्यात मोहोरी आणि बडीशेप टाका आणि ते तडकू द्या. आता हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घाला व कांदा ताकपिरी होईपर्यंत परतून घ्या.
आता भिजवलेले पोहे कढईमध्ये टाका आणि माध्यम आचेवर परता. पोह्यांच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
कढईवर एक किंवा दोन मिनिटे झाकण ठेवा, जेणेकरुन पोहे चांगले शिजतील.
एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर शेव, कोथिंबीर आणि बुंदी घाला. त्यावर दोन- तीन चिमूट जीरावन मसाला घाला आणि गरमागरम पोहे सर्व्ह करा. आणि जर इंदोरी स्टाईलने पोह्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर सोबत जिलेबी खायला विसरू नका.