हापूसच्या गरातून बनवा साजूक तुपातला ‘आंबा शिरा’; चव जिभेवर रेंगाळेल!

Aarti Badade

उन्हाळ्यातील लाडका गोड पदार्थ

हापूस किंवा केशर आंब्याचा रस वापरून बनवलेला आंबा शिरा हा उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि शाही महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

Mango Sheera recipe

|

Sakal

रेसिपीसाठी लागणारे साहित्य

१ वाटी रवा, १ वाटी साजूक तूप, १ वाटी आंब्याचा गर (पल्प), साखर, २ वाट्या गरम दूध, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स.

Mango Sheera recipe

|

Sakal

रवा खमंग भाजून घ्या

कढईत साजूक तूप गरम करून त्यात रवा तांबूस आणि खमंग होईपर्यंत नीट भाजून घेणे ही शिऱ्याची पहिली महत्त्वाची पायरी आहे.

Mango Sheera recipe

|

Sakal

दूध घालून वाफ काढा

भाजलेल्या रव्यात गरम दूध हळूहळू घाला आणि ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि रवा छान शिजेल.

Mango Sheera recipe

|

Sakal

आंब्याचा गर आणि साखर

रवा शिजल्यानंतर त्यात ताज्या आंब्याचा गर आणि साखर मिसळा. साखर विरघळल्यावर वेलची पूड व ड्रायफ्रूट्स टाकून २ मिनिटे वाफ काढा.

Mango Sheera recipe

|

Sakal

शिरा मऊ होण्यासाठी खास टिप्स

शिरा लुसलुशीत होण्यासाठी रव्यापेक्षा दुप्पट दूध वापरा. अधिक चव वाढवण्यासाठी साखरेऐवजी कंडेंस्ड मिल्कचा वापरही करू शकता.

Mango Sheera recipe

|

Sakal

गरम किंवा थंड; दोन्ही प्रकारे भारी!

हा शाही आंबा शिरा तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा फ्रिजमध्ये थंड करून डेझर्ट म्हणूनही त्याचा आनंद घेऊ शकता.

Mango Sheera recipe

|

Sakal

हापूस ते लंगडा! आंब्यांच्या प्रसिद्ध जातींना नावं कशी मिळाली जाणून घ्या

History of mango variety names India

|

Sakal

येथे क्लिक करा