Anushka Tapshalkar
केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी कांद्याचे तेल हा सर्वोत्तम मार्ग आहे. कांद्याच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फर केस गळती थांबवून त्यांना खोलवर पोषण देतात. यामुळे केस मजबूत, निरोगी आणि चमकदार होतात.
२ कांदे, २ चमचे मेथीच्या बिया, २०० मिली खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल
मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घेऊन किंवा रस काढण्याच्या मशीन मधून कांद्याचा रस काढून घ्या.
आता बारीक चिरलेला कांदा, मेथीच्या बिया मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. जेणेकरून बारीक पेस्ट तयार होईल.
एका पॅनमध्ये खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घ्या.
आता त्या तेलात कांद्याचा रस आणि बारीक केलेली पेस्ट मिक्स करून घ्या.
मिश्रण 20 मिनिटे उकळू द्या जेणेकरून ते सर्व घटक उत्तम प्रकारे एकत्रित होतील.
हे मिश्रण आत थंड होऊ द्या.
गाळणीने किंवा कॉटन कापडाच्या मदतीने तेल गाळून घ्या. आत हे तेल वापरण्यासाठी तयार झाले.