Aarti Badade
रिच, क्रीमी आणि मसालेदार ग्रेव्हीची ही भाजी खायला अतिशय चवदार लागते.
काजू, बटर आणि फ्रेश क्रीमच्या मदतीने ही रेस्टॉरंट स्टाइल भाजी साधारण ३० मिनिटांत घरी तयार करता येते.
kaju butter masala recipe
Sakal
१ कप काजू, २ चमचे बटर, १-२ चमचे तेल, २ कांदे आणि २ टोमॅटो घ्या. आले-लसूण पेस्ट, तमालपत्र, वेलची, दालचिनी, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, कसुरी मेथी, मीठ आणि २-३ चमचे फ्रेश क्रीम लागेल.
kaju butter masala recipe
Sakal
अर्धे काजू हलके सोनेरी होईपर्यंत बटरमध्ये भाजून बाजूला काढा. उरलेले काजू आणि एक कांदा सुमारे १० मिनिटे उकळून घ्या. थंड झाल्यावर दोन्हीची मऊ पेस्ट तयार करा.
kaju butter masala recipe
Sakal
कढईत बटर आणि थोडे तेल गरम करून त्यात तमालपत्र, वेलची आणि दालचिनी घाला.
त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता.
kaju butter masala recipe
Sakal
कढईत टोमॅटो प्युरी किंवा बारीक चिरलेले टोमॅटो घाला. हळद, काश्मिरी लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून मसाला चांगला परता, जोपर्यंत तेल सुटू लागते.
kaju butter masala recipe
Sakal
आता तयार केलेली काजू-कांद्याची पेस्ट ग्रेव्हीमध्ये घाला. चवीनुसार मीठ आणि आवश्यक तेवढे गरम पाणी घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा.
kaju butter masala recipe
Sakal
ग्रेव्ही झाकून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजू द्या. शेवटी भाजलेले काजू, कसुरी मेथी, गरम मसाला, फ्रेश क्रीम आणि थोडी साखर घालून आणखी २ मिनिटे शिजवा.
kaju butter masala recipe
Sakal
तयार आहे रेस्टॉरंट स्टाइल शाही काजू बटर मसाला! ही भाजी नान, चपाती, पराठा किंवा जिरा राईससोबत गरमागरम सर्व्ह करा आणि घरच्या घरी शाही मेजवानीचा आनंद घ्या.
kaju butter masala recipe
sakal
Indian Dishes Loved Around the World
Sakal