Yashwant Kshirsagar
शेवगा हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो, शेवग्याचे आयुर्वेदिक महत्व देखील आहे, आज आम्ही तुम्हाला ढाबा स्टाईल चमचमीत शेवगा मसाला भाजी घरच्या घरी कशी बनवायची याची माहिती देणार आहोत.
शेवग्याच्या शेंगा, खडे मसाले सर्व, मीठ,तेल, लाल तिखट, हळद,गरम मसाला, सुक खोबरं, कांदा,टोमॅटो,आलं लसूण पेस्ट, काळा मसाला , कोथिंबीर,
सर्वप्रथम, शेवग्याच्या शेंगांची साल काढून तुकडे करून घ्या.
कढईमध्ये सर्व खडे मसाले टाकून लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. नंतर त्यात सुके खोबरे भाजून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित भाजा आणि नंतर कांदा टोमॅटो, आलं आणि लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही व्यवस्थित भाजून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्याला तेल सुटेल.
आता त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि काळा मसाला आणि भाजून बारीक करून घेतलेले सर्व मसाले टाकून मिक्स करा.
मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून शिजवून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.
शेंगा शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून मिक्स करा. सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ढाबास्टाईल शेवगा मसाला. तयार आहे ती तुम्ही रोटी, चपाती भाकरीसोबत सर्व्ह करु शकता.